वेंगुर्ल्यात १८ रोजी वीज ग्राहक मेळावा

⚡वेंगुर्ला ता.१६-: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा वेंगुर्ला आयोजित व जिल्हा व्यापारी महासंघ, वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघ वेंगुर्ला यांच्या सहकार्याने शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे शेतकरी, व्यावसायिक, औद्योगिक व घरगुती ग्राहकांसाठी प्रथमच वीज ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात वीज बिलाबाबत तक्रारी, बंद असलेले पथदीप, वाढीव वीज बिले, कमी दाबाचा विद्युत पुरवठा, महावितरणाच्या विविध योजना अशा विविध तक्रारींचा तत्काळा निकाल लावण्यासाठी घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व शेतकरी ग्राहकांनी आपल्या मनातील शंका, कुशंका, गैरसमज, तक्रारी, सार्वजनिक हिताची मागणी करण्यासाठी या मेळाव्यात उपस्थित रहावे असे आवाहन ग्राहक पंचायत वेंगुर्ल्याचे अध्यक्ष डॉ. संजिव लिगवत व तालुका व्यापारी अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page