राज ठाकरे यांचा नियोजित सिंधुदूर्ग दौरा पार्श्वभूमीवर उदया मनसेची बैठक

⚡कणकवली ता.१५-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नियोजित सिंधुदूर्ग दौरा आणि येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका व मतदार नोंदणीसंदर्भात बुधवार 16 नोव्हेंबर 2022 रोजी कणकवली तेली आळी भवानी हॉल येथे सकाळी 10:30 वाजता अत्यंत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष, उप जिल्हाअध्यक्ष तालुका अध्यक्ष, जिल्हा सचिव तालुका सचिव उपतालुका अध्यक्ष, शहरअध्यक्ष, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंगीकृत संघटना जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी तसेच आजी-माजी पदाधिकारी,यांनी आयोजित बैठकीत वेळीच उपस्थित रहावे. असे आवाहन मनसे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार
परशुराम (जीजी) उपरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page