शर्लेत उद्या भजन डबलबारी

संजू परब यांच्या लग्न वाढदिवसाचे निमित्त;सरपंच उदय धुरी यांचे आयोजन

बांदा/प्रतिनिधी
भाजपचे प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नागराध्यक्ष संजू परब यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेर्ले सरपंच उदय धुरी मित्रमंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक १५ रोजी शेर्ले येथे २०-२० डबलबारी भजनी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कुरणी कुडाळचे बुवा विनोद चव्हाण विरुद्ध वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ देवगडचे बुवा संदीप लोके यांच्यात सामना रंगणार आहे. रात्री ८ वाजता श्री देव रवळनाथ मंदिर शेर्ले येथे माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत व संजू परब यांच्या हस्ते सामन्याचा शुभारंभ होणार आहे. भजन रसिकानी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच उदय धुरी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page