⚡कणकवली ता.१३-: मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाट्यानजिक
मालवाहतुक करणाऱ्या टेम्पोला झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.या अपघातात क्लीनर शुभम झोंजाळ (रा. कळे, कोल्हापूर) हा जागीच ठार झाला.
आकाश महाजन (रा. कोल्हापूर) हा आपल्या ताब्यातील टेम्पो (क्रमांक एम. एच. ०९ सी.ए १२८२) घेऊन कोल्हापूर येथून गोव्याच्या दिशेने जात होता.
हळवल तिठा येथे हा टेम्पो डाव्या बाजूला पलटी झाला. यात क्लीनर शुभम झोंजाळ (रा. कळे, कोल्हापूर) हा जागीच ठार झाला.
अपघानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. तातडीने महामार्ग पोलिस अधिकारी अरुण जाधव यांच्यासह त्यांचे पथक तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो हलवून अडकलेल्या शुभम झोंजाळ याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
