प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे
⚡वेंगुर्ला ता.०९-: राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस श्री किरण ठुबरे याचा बाळासाहेबाची शिवसेना पक्षात आज शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर याच्या उपस्थितीत प्रवेश केला.या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सावंतवाडी येथे शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात आयोजित सरपंच बैठकीत जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख श्री नितीन मांजरेकर शहर प्रमुख श्री सचिन वालावलकर, जिल्ह्या उपाध्यक्ष श्री सुनील मोरजकर ,श्री सचिन देसाई, श्री देवा कांबळी आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉग्रेस सेवा दलाचे जिल्हा सरचिटणीस किरण ठुबरे हे तुळस गाव मराठा समाज उपाध्यक्ष म्हणूनही काम करीत आहेत या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्कामानला जात आहे
यावेळी वेंगुर्लेतील खालील सरपंच ऊपस्थित होत. विकासात्मक विषयावर चर्चा करण्यात आली .श्री देवेंद्र डीचोलकर (सरपंच उभादाडा) ,श्री गणपत केळुसकर (ऊपसरपंच उभादांडा) , सौ गीतांजली कांबळी (सरपंच पेंडूर) श्री रुपेश मुंडेये (सरपंच भोगवे), श्री गणेश तारी (सरपंच चिपी),सौ. अदिती नाईक(सरपंच होंडावडा) , श्री मनोज उगवेकर(सरपंच शिरोडा), उप सरपंच श्री राहुल गावडे (शिरोडा), सौ भारती धुरी (सरपंच मेंढा), सौ रिया कुडव (सरपंच आसोली), सौ स्वप्नेशा पालव (सरपंच मोचेमाड ) , सौ प्राजक्ता मुंडये (सरपंच आडेली), उप सरपंच आडेली श्री संजू मांजरेकर , श्री शेखर कुडव (सरपंच आरवली) आदी उपस्थिती होते.
लवकर सर्व सरपंचाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांची भेट करून देण्याची विनंती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या कडे सर्व सरपंच यानी केली आहे ती त्यांनी मान्य केली आहे.त्यामुळे सर्व सरपंच याची मुख्यमंत्री याची भेट होणार आहे
