मनसे लॉटरीसेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर यांची आरोंदा पोलीस निरीक्षकांकडे मागणी
⚡सावंतवाडी ता.०२सहदेव राऊळ-: गुळदुवे खरी बसस्टॉपवर काही अज्ञात लोक दारू पिऊन कचरा तिथेच उडवत आहेत. तसेच याठिकाणी असलेल्या सोलर लाईटही या दारू पिणाऱ्या अज्ञातांकडून चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे तिथे दारू पिण्यासाठी बसणाऱ्या लोकांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरीसेना तालुकाध्यक्ष राजेश लक्ष्मण मामलेकर यांनी आरोंदा पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात मामलेदार यांनी म्हटले की, गुळदुवे खरी बसस्टॉपवर रोज रात्री दारू पिऊन अज्ञात लोक काचेच्या बाटल्या फोडून तीथेच कचरा टाकतात. तसेच तिथे लावलेली सोलर लाईट चार दिवस अगोदर चोरीला गेली आहे. या चोरीचा संशय या दारू पिणाऱ्या लोकांवर दिसून येतो. हा बसस्टॉप दारू पिण्यासाठी बांधलेला नाही आहे. तर तो बसस्टॉप शाळेतील मुलांसाठी व इतर लोकांसाठी बांधलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी दारू पिण्यासाठी बसणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी मामलेकर यांनी केली आहे.
