⚡वेंगुर्ला ता.०२-: मातोंड-नाटेलीवाडी येथील श्री देव खरोबा युवक कला-क्रीडा मंडळ, सिधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या विशेष सहकार्याने मातोंड सहकारी सोसायटीच्या रवळनाथ सभागृहामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटन प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले.
यावेळी मातोंड सरपंच जानवी परब, सुहास गवंडळकर, मोहिनी मडगांवकर, संतोष गावडे, बाबली वायंगणकर, ज्ञानेश्वर केळजी, ताता मेस्त्री, किशोर परब, हर्षल परब, सचिन कोंडये, नितीन परब, लाईफ टाईम हॉस्पिटलचे मनिष यादव, सिधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, अलिस्टर ब्रिटो, जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, संजय पिळणकर, बाबली गवंडे आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री देव खरोबा युवक कला-क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रसाद नाईक, संजय केणी, प्रथमेश नाईक, ओेमकार कोरगांवकर, निखिल वैद्य, अमर जबडे, नारायण केणी, सुनिल जबडे, पलाश वैद्य, दिपेश नाईक, शुभम नाईक, यशवंत केळजी, विशाल बागायतकर आदी उपस्थित होते.
