सौरभ ताम्हणकर मित्रमंडळातर्फे १३ रोजी स्वच्छता मोहीम

⚡मालवण ता.०१-: मालवण येथील भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने रविवारी दि. १३ नोव्हेंबर रोजी मालवण शहरातील दांडी ते बंदर जेटी किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.

सध्या पर्यटक मोठ्या संख्येने मालवणात दाखल होत असून समुद्र किनाऱ्यांना पर्यटक पसंती दर्शवित आहेत. त्यामुळेच सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने दांडी ते बंदर जेटी किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. रविवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम होणार असून नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक कार्यात हातभार लावावा, असे आवाहन सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page