भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधू कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिराच्यावतीने आयोजन
⚡सावंतवाडी ता.०७सहदेव राऊळ-:: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिराच्यावतीने रंगभरण व देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे तसेच राष्ट्रप्रेम व क्रांतिवीर यांच्यावरील ग्रंथरुपी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.
रंगभरण व देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा ही १३ ऑगस्ट रोजी शारदा विद्यालयामध्ये सकाळी ८.३० वाजता सुरू होणार आहे. रंगभरण स्पर्धेसाठी शारदा विद्यालयातील पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी तर तिसरी व चौथीच्या विद्यार्थांनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत भाग घेतला आहे. १० ऑगस्ट रोजी वाचनालयाच्या सभागृहात राष्ट्रप्रेम व क्रांतिवीरावरील पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले असून,सर्व वाचक व ग्रंथप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कै. उदय खानोलकर वाचनालायतर्फे करण्यात आले आहे.
