सावंतवाडीत लवकरच नीट जेईसाठीचे प्रशिक्षण

⚡सावंतवाडी ता.०६-: मराठा समाज बांधवांची मुले स्पर्धा परीक्षा अथवा नीट जेई आधी उच्चस्तरीय परीक्षांमध्ये त्यांना चांगले यश मिळावे यासाठी सावंतवाडीत लवकरच नीट जेईसाठीचे प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाणार आहे. तसेच इयत्ता आठवी पासूनच मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेचे ज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी कायमस्वरूपी स्पर्धा परीक्षा केंद्र ही सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती सावंतवाडी दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष संजू परब यांनी दिली.

दहावी बारावी व पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज शनिवारी आरपीडी हायस्कूल मध्ये घेण्यात आली यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत व गुणगौरव सोहळ्यात श्री परब यांनी मराठा समाजाचे भव्यदिव्य असे अत्याधुनिक भवन येत्या काळात सुरू केले जाणार आहे त्या दृष्टीने मंडळ कार्यरत आहे. असे स्पष्ट केले सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात मंडळाच्या वतीने गुणवंत गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी सचिव एडवोकेट संतोष सावंत कार्याध्यक्ष दत्ताराम सडेकर खजिनदार भूपेंद्र सावंत सहसचिव विनोद सावंत उपाध्यक्ष पंढरी राऊळ विश्वनाथ राऊळ सत्यजित धारणकर मेघना राऊळ उज्वला सावंत सु हा सिनी सडेकर महिला तालुकाध्यक्ष संजना परब दत्ताराम सावंत भक्ति सावंत नीरज देसाई सिद्धी निंबाळकर विना निंबाळकर अस्मिता भराडी सीमा नाईक साक्षी गवस गौरी परब आबा सावंत प्राचार्य सुरेश गावडे सतीश बागवे आदी उपस्थित होते यावेळी दहावी मध्ये 92 टक्के गुण व बारावी मध्ये 85 टक्के गुण तसेच पदवीमध्ये 75 टक्के गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन श्री परब यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी श्री परब म्हणाले मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी मेहनत करून स्पर्धा परीक्षा व जेई नीट मध्ये चांगले गुण प्राप्त करावेत आणि यश मिळवावे मराठा समाज निश्चित त्यांच्या पाठीशी उभा आहे. समाजाच्या वतीने भव्य असे मराठा समाज भवन उभारले जाईल.

यावेळी सचिव संतोष सावंत यांनी मराठा समाज बांधवांच्या मुलांसाठी करिअर गाईड्स कार्यशाळा व जे इ नीट वर्ग केंद्र सुरू केले जाणार आहे. यावेळी सतीश बागवे यांनी मराठा समाजाच्या बांधवांनी मेहनत आणि चिकाटीने अभ्यासाकडे लक्ष देऊन भाषेवर प्रभुत्व ठेवावे निश्चितपणे आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभे आहोत असे स्पष्ट केले. यावेळी आंबोली सैनिक स्कूलचे प्राचार्य प्राध्यापक सुरेश गावडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांनी आज विविध क्षेत्रात करिअर करण्यासारखे आहेत. आपल्या आवडीच्या क्षेत्र निवडून त्यामध्ये करिअर करावे यासाठी निश्चितपणे सर्वजण सहकार्य करतील यावेळी कार्याध्यक्ष दत्ताराम सडेकर यांनी मराठा समाज मंडळाची कार्यपद्धती व समाज बांधवांनी आरोग्य व योगा प्रशिक्षणाकडे वेळ द्यावा त्यातून आपले जीवन चांगले घडू शकते असे स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांमधून वैष्णव सावंत तनवी सावंत कुमार गावडे आदींनी मराठा समाजाने केलेला सत्कार निश्चितपणे हा घरचा सत्कार आहे. आमच्या यशात आई-वडील शिक्षक असेच समाजातील बांधवांचाही वाटा मोठा आहे .असे गौरव उद्गार काढले . यावेळी नवीन सदस्य झालेल्या महिलांचा गौरव करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सूत्रसंचालन मेघना राऊळ व उज्वला सावंत यांनी केले तर आभार सचिव सावंत यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी सभासद उपस्थित होते यावेळी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलीफोटो सावंतवाडीमराठा समाज उत्कर्ष मंडळगुणवंत गौरव सोहळ्यात विद्यार्थीसंजू परब एडवोकेट संतोष सावंतदत्ताराम सडेकरआधी छाया भूपेंद्र सावंत

You cannot copy content of this page