वेंगुर्लेत मच्छीमारांसाठी सामुदायिक संपर्क अभियान कार्यक्रम संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी- भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल, सिंधुदुर्ग पोलिस व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला पोलिस ठाणे हद्दीत सातेरी मंगल कार्यालय येथे सामुदायिक संफ कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित मच्छिमारांना नौदलाकडून सागरी सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

  यावेळी भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय कुमार, तटरक्षक दलाचे राजेंद्र बनकर, एमएमबी अधिकारी संदिप भुजबळ, वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव, मत्स्यविभाग वेंगुर्ला परवाना अधिकारी चिन्मय जोशी, संजय गावडे, पोलिस स्टाफ, वेंगुर्ल, शिरोडा व मूठ मच्छिमार सोसायटीचे प्रतिनिधी, स्थानिक मच्छीमार तसेच सागरी सुरक्षा रक्षक, वार्डन, स्थानिक ग्रामस्थ आदी उपस्थित होते. उपस्थितांना नौदलाकडून सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले व समस्या जाणून घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी मच्छिमारांना सागरी सुरक्षेबाबत घ्यावयाची दक्षता, नौकांवर वापरण्यात येणारी यंत्रणा, खराब हवामान असल्यास घ्यावयाची काळजी, नौकांवर आवश्यक असणारी कागदपत्रे, समुद्रात संशयास्पद आढळल्यास घ्यावयाची खबरदारी आदी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
You cannot copy content of this page