तर वीज वितरणच्या विभागीय कार्यालयात जनआंदोलन

युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे यांचा इशारा

दोडामार्ग ता.०५-:मागिल काही दिवसांपासून तेरवण मेढे,मुळस विजघर,पाळये,सोनावल,बाबरवाडी,तिलारी,केंद्रे आदि गावातील विद्युत पुरवठा नियमित खंडित होतो.या नियमितच्या खंडित विद्युत प्रवाहामुळे ग्रामस्थ,शाळकरी विद्यार्थी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.तसेच खंडित विद्युत पुरवठा तासंतास सुरू केला जात नाही.त्यामुळे महावितरणची विद्युत सेवा बेभरवशाची झालेली आहे.याबाबत अनेकदा महावितरण कार्यालयाशी प्रत्यक्ष अर्ज निवेदनाद्वारे लक्ष वेधले मात्र याची कोणतीही दखल घेतली नाही.आणि दररोज विद्युत पुरवठ्याच्या समत्सा कायम आहे.येत्या आठवड्यात यात सुधारणा व नियमित विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास तेरवण मेढे पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह दोडामार्ग येथील उपविभागीय कार्यालयात जनआंदोलन करण्याचा इशारा युवासेना तालुका प्रमुख मदन राणे यांनी निवेदनाद्वारे दिले आहे.

You cannot copy content of this page