कणकवली पोलिसांनी हरवलेल्या वडिलांना मुलांच्या केले स्वाधीन
⚡कणकवली ता.०५-: तमिळनाडूतून मुबंई येथे येत असताना ज्ञानप्रकाशम मरीय अँथोनी (वय ६५ वर्षे) हे जामनगर एक्सप्रेसने ३ ऑगस्टला कणकवली रेल्वे स्थानकात उतरले.त्याचा संपर्क होत नसल्याची खबर मुलगा अँथोनी ज्ञानप्रकाशम स्वामी (वय ३३ वर्षे,रा.कांदिवली, मुबंई )यानी दिली.त्यानुसार अवघ्या १२ तासांत कणकवली पोलिसांनी ज्ञानप्रकाशम मरीय अँथोनी यांचा शोध घेत त्यांना श्रीधर नाईक उद्यान येथून ताब्यात घेत मुलांच्या स्वाधीन केले.
स्वामी कुटूंबीय सध्या मुंबई येथे राहतात.खबर देणार यांनी म्हटले आहे की, माझी आई मुत्तुकणी , वडील ज्ञानप्रकाशम मरीय अथोनी व भाऊ – माणिकराज अशी माणसे एकत्र राहतात . वडील ज्ञानप्रकाशम व भाऊ माणिकराज हे सुमारे दोन महिन्यापूर्वी आमचे मूळ गावी तमिळनाडू येथे गेलेले होते . वडील व त्यांच्यासोबत माझा भाऊ माणिकराज व माझ्या मामाची मुलगी जया पाखियम असे २ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०५.१५ वा . जामनगर एक्सप्रेसने तमिळनाडू येथून मुंबई येथे येण्यासाठी निघालेले होते . ३ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास मला फोन करून कळविले की , आम्ही मुंबई येथे असताना वडील ट्रेनमधून खाली उतरले ते पुन्हा ट्रेनमध्ये चढलेले नाहीत . ते नेमके कोणत्या स्टेशनला उतरले ते काही समजलेले नाही , असे सांगितले . तसेच मामे बहिण ट्रेनने मुंबई येथे निघून आले . मी माझ्या वडीलांचा मोबाईल नंबर बंद लागत होता . त्यानंतर मी काल ३ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी २ वा . लोकमान्य टिळक टर्मिनल येथे जाऊन चौकशी केली व त्यांचा शोध घेतला . परंतु ते मिळून आलेले नाहीत म्हणून मी ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठाणे , पनवेल , रत्नागिरी , चिपळूण या रेल्वे स्टेशनवर येऊन चौकशी केली तसेच तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले परंतु तेथेही माझे वडील सदर ट्रेनमधून उतरलेले दिसून आले नाहीत . कणकवली रेल्वे स्टेशन येथे आलो व तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता खबर देणार यांचे वडील ३ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८.३३ वा . कणकवली रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्मवरून खाली उतरत असताना दिसून आलेले आहे . त्यावरुन माझी खात्री झाली . वडील कणकवली रेल्वे स्टेशन येथून नापत्ता झालेले आहेत . त्याचे ज्ञानप्रकाशम मरीय अँथोनी वय ६५ वर्षे , उंची सुमारे ५ फुट ४ इंच , रंग – सावळा , केस साधारण पिकलेले , चेहरा – उभट , नाक – सरळ , कान- मोठे , अंगात लाल रंगाचे फुल हाताचे शर्ट व नेसणीस चॉकलेटी रंगाची फुल पँट व पायात काळया रंगाचे प्लाटिकचे चप्पल व सोबत नोकिया कंपनीचा मोबाईल होता.त्यावर कणकवली शहरातील श्रीधर नाईक उद्यान येथून ताब्यात घेत ज्ञानप्रकाशम मरीय अँथोनी (वय ६५ वर्षे , रा . सिदधीविनायक चाळ बाबरेकर नगर कांदिवली वेस्ट मुंबई) यांना नातेवाईकांच्या ताब्यात
दिले. हा तपास कणकवली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण यांनी केला.
