तर शिंदे गटाचा प्रभाव दिसला नाही;भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका
सावंतवाडी
राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत शिंदे गट उघडपणे कुठेच प्रभावी दिसला नाही तर शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे राज्याचे आहेत मात्र त्यांची सावंतवाडीतील सभा पाहता ज्या तुलनेत पूर्वी जी शिवसेना बघितली ती दिसून आली नसल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले.
तर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले तरी स्थानिक पातळीवर शंभर टक्के स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, मात्र वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असेही तेली यांनी स्पष्ठ केले.
येथील श्रीराम वाचन मंदिर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री तेली बोलत होते.यावेळी त्याच्यासोबत महेश सारंग, बाळू देसाई,अजय गोंदावळे, राजेंद्र म्हापसेकर, लखम सावंत भोसले,एकनाथ नाडकर्णी,गुरुनाथ पेडणेकर,सुधीर नाईक,चंद्रकात जाधव,आदी उपस्थित होते.
