शेळीचा बिबट्याने पाडला फडशा

दहा हजारांचे नुकसान

वैभववाडी संजय शेळके
कुर्ली खडकदारा येथील शेतकरी संतोष धोंडू झोरे यांच्या मालकीच्या शेळीचा बिबट्याने फडशा पाडला. यामुळे त्यांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
संतोष झोरे हे शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी बिबट्याने त्यांच्या शेळ्याच्या कळपातील एका शेळीवर हल्ला करुन ठार केले. याबाबत वनविभागाला माहीती दिल्यानंतर वन रक्षक अमित काकीतकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

You cannot copy content of this page