केसरकर सत्तेसाठी काहीही करू शकतात, हे सत्य आले समोर

तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांची टीका

⚡सावंतवाडी ता.०३-: जिल्ह्यातील दहशतवाद दहशतवाद असे ओरडुन दोन वेळा आमदार झालेल्या केसरकरांना आता दहशतवाद दिसत नसून, ज्याच्या विरोधात त्यांनी लढा दिला त्यांच्याच मांडीला मांडी लावून ते बसणार असून, सत्तेसाठी ते काहीही करू शकतात हे सत्य जनतेसमोर आले असून, त्याचे खरे रूप समोर आले आहे. अशी जोरदार टीका तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे.

यावेळी युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या सभेला हजारोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित असताना केवळ 200 लोक उपस्थित होते. असे सांगून शिवसैनिकांचा अपमान केला आहे. ज्या शिवसैनिकांनी केसरकरांना 2 वेळा आमदार केले. ज्या शिवसेनेने एक वेळ मंत्री केल. त्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याने शिवसेनेला ऊर्जा मिळाली असून, आमदार दीपक केसरकर यांचा पराभव निश्चितच करणार असून, त्यांचे डिपॉझिट जप्त करणार असा इशारा दिला आहे.

यावेळी डॉ. जयेंद्र परुळेकर, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, गुणाजी गावडे, विशाल सावंत,

You cannot copy content of this page