मैदानात उतरलेले दुसरे राऊतही शिवसेनेचे करणार नुकसान

आ.दीपक केसरकर; माझ्यावरील टीकेला मतदार संघात येऊनच उत्तर देणार ..

⚡सावंतवाडी ता.०१-: शिवसेनेच्या आजच्या सावंतवाडीतील निष्ठा यात्रेत शिवसेना नेत्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे उत्तर मी सावंतवाडीत येऊन देणार असून, माझ्या शिवसेना प्रवेशावेळी लाखो लोकांची उपस्थिती होती. परंतु, आज युवासेनेचे मोठे नेते आले असताना फक्त पाचशे – हजार शिवसैनिक जमा होतात. यावरून माझी माझ्या मतदार संघातील ताकद त्यांना कळली असेल. असा पलटवार शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर यांनी ऑनलाईन आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, एका राऊतानी शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यांना इडी ने अटक करताच दुसरे राऊत मैदानात उतरले असून, ते देखील शिवसेनेचे नुकसानच करतील असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे

You cannot copy content of this page