⚡मालवण ता.१९-: शेतकऱ्यासाठी एक दिवस- बांधावरची शाळा’ या जिल्हा परिषदेच्या उपक्रमात ओझर विद्यामंदिर कांदळगावच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन अन्नदात्या शेतकरी राजाला किती कष्ट करावे लागतात, हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी भाजप किसान मोर्चा मालवणचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध शेतकरी महेश सारंग यांच्यासाठी एक दिवस देऊन त्यांच्या हडी येथील कालिकादेवी मंदिराजवळील शेतीमध्ये बांधावरील शाळेचा अनुभव घेतला. या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शेतीच्या मळ्यामध्ये चिखलात भाताच्या रोपांची लावणी करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत तसेच शास्त्रीय पद्धतीने भात लावणी कशी करावी, याचेही ज्ञान घेतले.
बांधावरच्या या शाळेत ओझर विद्यामंदिरचे विद्यार्थी दिक्षा दिपक सुर्वे, सायली सुहास सुर्वे, ईशा गणेश सुर्वे, प्रतिक्षा दामाजी सुर्वे, मानसी संतोष हडकर, सुभक्ती विजय सांडव, श्रेया संतोष गावकर, कृतिका दिवाकर भिसळे, नजमुन्निसा शहानवाज शेख, माहिन शहानवाज शेख, नौमान मुबारक गाडीवान, तस्बिया अफझल शेख, साक्षी गोविंद कदम तसेच शिक्षक पी. के. राणे आणि डी. डी. जाधव हे सुद्धा सहभागी झाले होते.
यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, ओझर विद्यामंदिर शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, किसान मोर्चा मालवणचे उपाध्यक्ष प्रसाद भोजणे, सल्लागार हरिभाऊ केळूसकर, संजय मळेकर, समृद्धी मळेकर तसेच हडी गावचे ग्रामस्थ मया मांजरेकर, अंकिता लाड,अनिता हडकर, मंगला हडकर आदींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी ओझर विद्यामंदिरचे उपक्रमशील मुख्याध्यापक प्रतापराव खोत जे या प्रकारचे विविध उपक्रम राबवत आहेत.
