आमदार दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमीत्त बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

बांदा/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी गृह, वित्त आणि अर्थ नियोजन राज्यमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमीत्त येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी मुलांसामवेत वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी संदेश पावसकर, भाऊ वाळके, पांडुरंग नाटेकर, राकेश वाळके, मंगलदास साळगावकर, साई विरनोडकर, दादा विरनोडकर यांच्यासह मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, जे. डि. पाटील आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page