वैभववाडी प्रतिनिधी
माध्यमिक विद्यालय करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत मधुकर भाट वय 52 रा. कोल्हापूर आर.के. नगर यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. श्री भाट यांना शनिवारी अस्वस्थ वाटू लागल्याने सहकारी शिक्षकांनी त्यांना कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
ग्रामविकास शिक्षण परिषद कोल्हापूर या संस्थेत गेली वीस वर्षे ते कार्यरत होते. संस्थेतील कोल्हापूर, सडुरे, तिसंगी व करूळ या चारही शाखेत त्यांनी सेवा बजावली होती.विकास विद्यालय सडूरे अरुळे येथे जास्त सेवा केले होती. जून महिनेत ते कोल्हापूर शाखेतून करूळ येथील माध्यमिक विद्यालयात बदलीने रुजू झाले होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते. उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
