शिंदे गट प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केले समाधान
⚡सावंतवाडी ता.१८-: तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचे महत्त्वाचे पाच प्रश्न सोडवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. माझ्या राजकीय आयुष्यात हे प्रथमच घडत असल्याने आपण भारावून गेलो आहे, भविष्यात असेच अन्य प्रश्न मार्गी लागल्यास सिंधुदुर्गचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही असे भावनिक उद्गार गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी काढले.
