वराडकर हायस्कूलच्या दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ओरोस ता.२०-:

मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. ९५ पैकी ९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळा व संस्था यांच्यावतीने सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


प्रशालेतून समृद्धी श्रीकृष्ण गावडे हिने 96.26 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. द्वितीय क्रमांक प्रतिक्षा निळकंठ मेस्री हिने 89.80 टक्के गुण मिळवत तर तृतीय क्रमांक मयुर चव्हाण यांनी 89.40 टक्के गुण मिळवत व मृदुला अशोक करावडे हिने 89.40 टक्के गुण मिळवत संयुक्त मिळविला आहे.


निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व शाळा यांच्यावतीने प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संजय नाईक, संस्था पदाधिकारी डॉ उल्हास वराडकर, बापू वराडकर, श्रीमती देसाई, सुनील नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. १०० नंबरी यश मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा
विश्वस्त अॅड. एस .एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर उपाध्यक्ष आनंद वराडकर
सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई खजिनदार रवींद्रनाथ पावसकर व इतर संचालक
सल्लागार कर्नल शिवानंद वराडकर, अॅड.ऋषी देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर
मुख्याध्यापक संजय नाईक व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page