मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी केला बार मालक व वेटरवर हल्ला

मालवणात खळबळ

⚡मालवण ता.२०-: मालवण शहरातील एका बिअर बार मध्ये मद्य प्राशन केलेल्या काही व्यक्तींनी मद्यधुंद अवस्थेत बार मालक व वेटरवर हल्ला चढवीत मारहाण केल्याची घटना काल रात्री घडली. याबाबत बार मालकाने मालवण पोलीस ठाण्यात धाव घेतली असली तरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता .याबाबत मालवण जोरदार चर्चा सुरू आहे

मिळालेल्या माहितीनुसार, मालवण शहरातील एका बिअर बार शॉपी मध्ये काल रात्री काही व्यक्ती बिअर प्राशन करत होते. रात्री १० वाजता हा बार बंद होत असल्याने तेथील वेटरने त्या व्यक्तींना बार बंद करण्याची वेळ झाली असल्याचे सांगत त्यांना जाण्याची विनंती केली. मात्र वेटरच्या विनंतीला न प्रतिसाद न देता त्या व्यक्तींनी वेटरशी हुज्जत घातली. यावेळी झालेल्या वादातून त्या व्यक्तींनी वेटरला मारहाण केली. यावेळी बार मालक उपस्थित नव्हता. त्यामुळे वेटरने तात्काळ मालकाशी संपर्क साधून बार मध्ये येण्यास सांगितले. बार मालक बार मध्ये उपस्थित झाला असता त्या व्यक्तींनी त्यालाही न जुमानता त्याच्यावरही हल्ला चढविला. या घटनेत बार मालक व वेटर जखमी झाले. याबाबत बार मालकाने मालवण पोलीस ठाण्यात धाव घेतली असून याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू होती

You cannot copy content of this page