मळगाव येथे २२ जून रोजी योग मार्गदर्शन

उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली विषयावर डॉ. संगीता तुपकर यांचे मार्गदर्शन

सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ-: योग दिनाचे औचित्य साधून’उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात २२ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता योग मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

योग मार्गदर्शक डॉ. सौ.संगीता तुपकर या यावेळी योगांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
हे मार्गदर्शन कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर व मळगाव येथील सखी ग्रूपच्या वतीने वाचनालयाच्या रमाकांत खानोलकर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे, या मार्गदर्शनला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाचनालय संचालक मंडळ व सखी ग्रुपच्यावतीने केले आहे.

You cannot copy content of this page