⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्था संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल प्रशालेचा शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ चा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेचे एकुण ३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते . सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
कु.मोहम्मद जकी सलीम मुल्ला याने ९४.८० टक्के गुण मिळवून प्रथम तर कु रुशदा अनिस पडवेकर हिने ९२.४० टक्के गुण मिळवून द्वितीय आणि कु.आर्य दिनेश गावडे याने ९१.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच कु.आस्मा युसूफ तडवी हिने ९०.४० टक्के गुण मिळवून चौथ्या आणि कु.फायजा वसीम बेग व कु.मसिराह इम्रान नदाफ यांनी प्रत्येकी ९०.२० टक्के गुण मिळवून पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
संस्था पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, पालक – शिक्षक कार्यकारीणी समिती या सर्वांनी यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
