मालवण ता.११ प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेत मालवण तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मालवणच्या टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी हर्षिता पांडुरंग ढोके हिचा मालवण येथील मातृत्व आधार फाउंडेशनच्यावतीने माजी जि. प. सदस्या श्रमीका संतोष लुडबे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला
मालवण दांडी येथील मच्छिमार कुटुंबातील हर्षिता पांडुरंग ढोके हिने बारावी परीक्षेत ५३९ गुण मिळवून मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल मालवणच्या मातृत्व आधार फाउंडेशनने तिचा सत्कार केला. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, अध्यक्ष आपा चव्हाण, सेक्रेटरी विश्वास गावकर, दादा वेंगुर्लेकर, दिलीप घारे, तोडणकर, विनोद सातार्डेकर, ढोले बाबू आदी व इतर उपस्थित होते. यावेळी हर्षिता हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
