⚡मालवण ता.११-: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ‘ओझर विद्यामंदिर कांदळगाव’ या माध्यमिक शाळेच्या हीरकमहोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या सन १९८६- ८७ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेला पंचवीस हजार रुपये किमतीचा स्क्रीनसह एल. ई. डी. प्रोजेक्टर भेट म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक पी. आर. खोत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी बॅचचे प्रतिनिधी म्हणून सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सतीश कदम, ओझर विद्यामंदिर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रविण पारकर, ओझर येथील हॉटेल व्यावसायिक संजय उर्फ भाऊ कांबळी, साहा. शिक्षक डी. डी. जाधव, पी. के. राणे, शिक्षकेतर कर्मचारी भास्कर पाताडे, मधुसूदन परुळेकर आदी उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांच्या या बहुमोल सहकार्याबद्दल संस्थेच्या व शाळेच्या वतीने मुख्याध्यापक पी.आर. खोत यांनी आभार मानले. या शैक्षणिक साहित्याचा वापर प्रभावी अध्यापनासाठी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. प्रशालेने सुरू केलेल्या नवनवीन उपक्रमांना माजी विद्यार्थी आणि इतर दात्यांचे सहकार्य लाभत असल्याबद्दल मुख्याध्यापकांनी समाधान व्यक्त केले.
