फोंडाघाट येथील उतारावर दोन कंटेनर ट्रकची समोरासमोर धडक; वाहतूक ठप्प

⚡कणकवली ता.११-: पावसाळा सुरुवात होताच अपघाताची मालिका सुरू झाली आहे काल असलदे येथे अपघात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी फोंडाघाट बस स्टँडच्या वरील उतारावर दोन कंटेनर ट्रकची सकाळी ६.४५ वा. च्या दरम्यान समोरासमोर धडक बसून अपघात झाला. यामुळे कणकवलीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती.

फोंडाघाट बस स्टँडच्या वरील उतारावर
सकाळीच झालेल्या अपघातामध्ये कोल्हापूरच्या दिशेने भंगार घेऊन जाणारा कंटेनरट्रक (एनएल०१ एबी ५८३७) व कणकवली वरून पॅकिंग पॉलिथिन मटेरियल घेऊन जाणारा कंटेनरट्रक (आरजे११ जीसी ०४२१) यांची फोंडाघाट बसस्थानकच्या उतारावर समोरासमोर धडक बसून अपघात झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही ट्रकचे एक्सेल पार्ट तुटल्याने पुढील दोन ते तीन तास वाहतूक मोकळी होण्याची शक्यता नसल्याने सकाळीच कामावर जाणाऱ्यांचा मोठा खोळंबा झाला. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून सूरु करण्यात येऊन काही काळानंतर वाहतूक सुरू करण्यात आली.

You cannot copy content of this page