Headlines

कवी विजय सावंत यांच्या ‘जगण्याचे
आर्त’ काव्यसंग्रहाचे आज प्रकाशन

सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेतर्फे आयोजन

⚡कणकवली ता.०८-: समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गतर्फे बुधवार ८ जून रोजी सायं. ७ वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी विजय सावंत (देवसू) यांच्या ‘जगण्याचे आर्त’ या काव्यासंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे ( पुणे ) यांच्या हस्ते ऑनलाईन गूगलमीट द्वारे करण्यात येणार आहे. या वेळी जेष्ठ बाललेखक एकनाथ आव्हाड (मुंबई) तसेच कवयित्री प्रमिता तांबे आणि कवी विजय सावंत या काव्यसंग्रहावर भाष्य करणार आहेत. तरी काव्यरसिकांनी या कार्यक्रमास उपस्थितीत राहण्याचे आवाहन समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी केले आहे.

विजय सावंत हे पेशाने शिक्षक असून गेली पंचवीस वर्ष सातत्याने कविता लेखन करीत आहेत. त्यांचा सन 2013 साली ” प्रकाश किरणांच्या शोधात ” हा कवितासंग्रह को.म.सा.प.दादर शाखेतर्फे मधुमंगेश कर्णिक, यशवंत देव, डाॅक्टर सिसिलिया कार्व्हालो यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता तर त्यानंतर गेल्यावर्षी प्रकाशित झालेल्या ” सिंधुदुर्गातील आजची कविता ” या प्रातिनिधिक कवितासंग्रहातही त्यांच्या कवितांचा समावेश होताआणि आताच ” जगण्याचे आर्त ” नावाचा त्याचा नवीन कवितासंग्रह प्रभा प्रकाशन ( कणकवली)तर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.
सदर कवितासंग्रहातील कवितांमधून त्यांनी आपल्या सभोवताली घडणा-या घटनांवर, सर्वसामान्य माणूस केंदरस्थानी ठेवून भाष्य केले आहे.जात ध्येयं, देव ,देश, शेती-गाव निष्ठा, माणूस आणि माणूसकी याभोवती त्यांच्या कविता फिरतांना दिसतात. अधिक माहितीसाठी संपर्क-मनिषा पाटील- 9422819474 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page