⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजू परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार नुसार आम्ही कार्यरत आहोत आणि त्यांच्या विचाराने आम्ही काम करणार आहोत असे स्पष्ट करत गावा-गावात 6 जून राज्याभिषेक दिन साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले.
याप्रीत्यर्थ शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात येऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी यावेळी माहिती देण्यात आली यावेळी मंडळाचे संस्थापक सचिव दत्ताराम सडेकर सचिव एडवोकेट संतोष सावंत खजिनदार भूपेंद्र सावंत साई हवालदार विनोद सावंत सुहासिनी सडेकर पंढरी राऊळ हिंद मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष वि शा ल परब अमित परब अभी पंडित नागेश पाटील आदी उपस्थित होते
