वासुदेव नाईक यांना गटविकास अधिकारी वर्ग १ पदी पदोन्नती

सावंतवाडीत मिळाली नियुक्ती

ओरोस ता.०१-:सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सहाय्यक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांना शासनाने गटविकास अधिकारी वर्ग १ या पदावर बढती दिली आहे. बढतीने त्यांची सावंतवाडी पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी या पदावर नियुक्ती दिली आहे.

वासुदेव नाईक हे थेट विस्तार अधिकारी या पदावर प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांना सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाली होती. या काळात त्यांनी सावंतवाडी पंचायत समितीत सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच प्रभारी गटविकास अधिकारी या पदावर यशस्वी काम केले आहे. जिल्हा समाजकल्याण अधिकारी म्हणून सुद्धा यशस्वी काम केले आहे. सध्या ते जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर कार्यरत होते. शासनाने सोमवारी राज्यातील ७४ सहाय्यक गटविकास अधिकारी यांना गटविकास अधिकारी वर्ग १ या पदावर बढती दिली आहे. यात वासुदेव नाईक यांचा समावेश असून त्यांना सावंतवाडी गटविकास अधिकारी या रिक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page