डंपर चालक जागीच ठार;झराप पत्रादेवी बायपास नजिक घडला अपघात
सावंतवाडी ता.०१-:* मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपास वर मळगाव जोशी मांजरेकर वाडी येथे टायर फुटल्याने उभ्या असलेल्या डंपर ला मागाहून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मागाहून येणाऱ्या डंपर चा चालक जागीच ठार झाला. ही धडक एवढी मोठी होती की उभा असलेला डंपर चक्क डिव्हायडर वर चढला व मागील डंपरचा चालक कॅबिनित अडकून पडला.
बुधवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.परशुराम चिन्नी राठोड २४ रा. गुढीपूर कुडाळ मूळ राहणार विजापूर कर्नाटकअसे अमृत चालकाचे नाव असून त्याला जेसीबीच्या सहाय्याने डंपर मागे खेचून गाडीतुन बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थांसह डंपर चालक-मालक उपस्थित असून सावंतवाडी पोलिसही दाखल झाले आहेत.
