काल मनसे पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा होता प्रयत्न;पोलिसांत सुद्धा दिली तक्रार
सावंतवाडी ता.३०-:* मनसे लॉटरी सेना तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर यांच्यावर परजिल्ह्यातील व्यवसायिकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न रविवारी सायंकाळी करण्यात आला असून, याबाबत आज मनसे पदाधिकाऱ्यांनी त्या व्यवसायिकाला जाब विचारत आरोंदा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यावेळी त्या व्यवसायिकांने माफी मागितल्याने हे प्रकरण मिटविण्यात आले.
यावेळी आशिष सुभेदार विभागअध्यक्ष मंदार नाईक, मनसे लॉटरी सेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर,नंदू परब, विश्वनाथ राऊळ, मनोज कांबळी, योगेश जोशी आदी उपस्थित होते.
