बांदा/प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ बांदा व व्हीजन आरएक्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०३ जून रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात ४० वर्षे पुढील व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष मंदार कल्याणकर व सचिव फिरोज खान यांनी केले आहे.
