जंतुनाशक, फिनेल ची खरेदी अद्याप का नाही?

माजी नगरसेवक राजू बेग यांचा सवाल; चौकशी करून कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी

सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी शहरातील सार्वजनिक शौचालय, गटारे, कचरा टाकण्याची ठिकाणे येथे जंतुनाशक, फिनेल यांची फवारणी न केल्याने “त्या” ठिकाणी दुर्गंधी पसरली असून, याबाबत आरोग्य विभागात चौकशी केली असता, जंतुनाशके, फिनेल स्टॉक मध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी या वस्तूंची खरेदी करणे आवश्यक असताना देखील अद्याप या वस्तू का खरेदी करण्यात आल्या नाहीत. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक राजू बेग यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी तातडीने या वस्तू खरेदी करून शहरात फवारणी करण्यात यावी असे देखील सांगितले आहे.

You cannot copy content of this page