अती मद्यपान केल्याने तोल जाऊन कोसळला होता तलावात…
सावंतवाडी ता.२७-:* मोती तलावाकाठी बसलेला एक युवक तोल जाऊन तलावात कोसळला असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला वेळीच बाहेर काढण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, त्या युवकाने अती मद्यपान केल्याने तलावाच्या काठावर बसलेला असताना तोल गेल्याने तो तलावात कोसळला होता.
