‘मुस्लिम हेल्थ अँड वेलफेअर’ला पुरस्कार

सावंतवाडी : येथील ‘मुस्लिम हेल्थ अँड वेलफेअर फाउंडेशन’ या संस्थेला रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्यावतीने ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक व आरोग्यदायी कार्य’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार दीपक केसरकर तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘मुस्लिम हेल्थ अँड वेलफेअर फाउंडेशन’ या संस्थेने मानवता धर्म जपताना आपल्या विविध उपक्रमातून सर्व समाजासाठी सामाजिक व आरोग्य सेवा दिली आहे. तसेच कोरोनाकाळात व पूरस्थितीमध्ये पूरग्रस्तांना निस्वार्थीपणे मदतकार्य करून समाजासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब इंटरनॅशनल समुहामार्फत रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी रो. रासम, रो. नाईक, रो. रेडिझ, रो. उचगावकर, रो. म्हापसेकर, रो. डॉ. जोशी, रो. दुबाशी, इनरव्हील व रोट्रॅक्टचे सर्व पदाधिकारी, मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष सोहाब बेग, उपाध्यक्ष हिदायतुल्ला खान, सचिव सलीम मुल्ला, सहसचिव रिजवान पटेल, सहखजिनदार मोहसीन मुल्ला, सदस्य तबरेज बेग, नदीम दुर्वेश आदी उपस्थित होते याप्रसंगी फाउंडेशनला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page