संजू परबानी पुन्हा एकदा सावंतवाडीचे नगराध्यक्ष होऊन दाखवावे…

जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आव्हान; पैशाची मागणी पूर्ण न केल्याने संजू परब आले नाहीत शिवसेनेत…

*⚡कुडाळ ता.२५-:* संजू परब यांना आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. संजू परब यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष होऊन दाखवावे. असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.

सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांना शिवसेनेत यायचे होते. परंतु, त्यांना हवी असणारी धनशक्ती शिवसेना पुरी करू शकली नसल्यानेच ते शिवसेनेत आले नाहीत. असा आरोप देखील जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी यावेळी केला आहे.

You cannot copy content of this page