माईन ग्रा.प.पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा केला पराभव
*⚡कणकवली ता.१९-:* माईन ग्रामपंचायत पोटनिवडणूक सेना व भाजपने प्रतिष्ठेची केली होती.या प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपचे उमेदवार नितीन पाडावे यांनी शिवसेनेच्या श्रीकृष्ण घाडीगावकर यांचा पराभव केला कणकवली तहसीलदार कार्यालयात झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत नितीन पाडावे यांना 45 श्रीकृष्ण घाडीगावकर यांना 28 मते मिळाली तर 3 नोटा एकूण 76 असे मतदान झाले.नितीन पाडावे यांचा 17 मतांनी विजय झाला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळकृष्ण परब यांनी काम पाहिले. या निवडीनंतर नितीन पाडावे तहसीलदार कार्यालयाबाहेर आले असता तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांना मिठी मारताच त्यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर नितिन पाडावे यांना तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांनी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले.यावेळी भाजपचे नगरसेवक अण्णा कोदे, संदीप मेस्त्री, संदीप सावंत,सरपंच सौ.राणे,भगवान दळवी,लक्ष्मण घाडीगवकर, स्वप्नील चिंदरकर,नितीन पाडावे, पप्पू पुजारे,गणेश तळगावकर, मकरंद सावंत,राजू हिर्लेकर,समीर प्रभुगावकर,अभय गावकर,सर्वेश दळवी,सौ.कारकेर आदी उपस्थित होते.
