तालुक्यातील व्याघ्र गणना योग्य पद्धतीने करा..

तालुक्यात वाघ, बिबट्या असतानाही खोटी माहिती दिल्यास मनसेशी गाठ; तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा इशारा

*⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी तालुक्यात होणारी व्याघ्र गणना ही व्यवस्थित व्हावी अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सावंतवाडी तालुक्यात पट्टेरी वाघ असताना देखील वनविभागाकडून त्याबाबतची माहिती लपवली जात आहे. तसेच अनेक भागात बिबट्या सारखे अनेक वन्यप्राणी असतानाही सरकारी फॉरेस्ट जमिनी वनविभाग तालुक्यातील काही मायनिंग क्रशरच्या घशात घालत असल्याचा आरोप त्यानी यावेळी केला आहे. यावेळी होणारी व्याघ्र गणना ही 15 जानेवारी ते 21 जानेवारी अशी सहा दिवस होणार असून, यामध्ये त्यांच्या संख्येसह, ते कुठे राहतात त्या क्षेत्राचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. यावेळी या व्याघ्र गणनेची योग्य माहिती मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे देत असताना दिरंगाई करू नये, तसे आढळल्यास मनसेशी गाठ असेल असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिला आहे. यावेळी मनसे चित्रपट सेना सहसचिव दिनेश मठकर, एसटी परिवहन सेना कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, परिवहन जिल्हाध्यक्ष अँड राजू कासकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page