गोर गरीब जनतेला मदतीचा हात देत मनसेने साजरी केली मकरसंक्रात

*⚡सावंतवाडी ता.१५-:* सावंतवाडी शहर मनसेच्या वतीने मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून आज जिमखाना येथील तसेच इतर ठिकाणी जाऊन गोरगरीब कुटुंबांना गोड पदार्थ व विविध प्रकारचे धान्य वाटप केले.

यावेळी परिवहन जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर, मनसे कार्याध्यक्ष संतोष भैरव, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, शहराध्यक्ष आशीष सुभेदार, उपशहराध्यक्ष शुभम सावंत यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. त्यांनी केलेल्या या उपक्रमामुळे गोरगरीब कुटुंबांना एक आपुलकीचा गोडवा अनुभवायला मिळाला. त्याप्रसंगी उपस्थित मंडळींनी त्यांचे कौतुक करत आभार मानले.

You cannot copy content of this page