जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे बांदा भाजप कडून सत्कार…

ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांनी दिल्या शुभेच्छा

*⚡बांदा ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाल्यानंतर बांदा भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला आहे. यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा मराठा समाज अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर, दिपक सावंत, ज्ञानेश्वर सावंत, सिद्धेश महाजन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page