लिनेस क्लबचा पदग्रहण संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.१२-:* लिनेस क्लब ऑफ वेंगुर्लेचा पदग्रहण सोहळा ५ जानेवारी रोजी उभादांडा-बागायत बीच येथील मरमेड रिसॉर्ट येथे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ.मंजिरी कुलकर्णी, शपथप्रदान अधिकारी अॅड.अंजू मालू व प्रमुख पाहुण्या म्हणून नलिनी पारेख उपस्थित होत्या. यावेळी उर्मिला सावंत यांनी अध्यक्षपदाची, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, शर्मिला मठकर, कविता भाटीया यांनी अनुक्रमे उपाध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदार पदाची शपथ घेतली. यावेळी लिनेस बिना भाटिया, स्मिता कोयंडे, अंजली धुरी, मंदाकिनी सामंत उपस्थित होत्या. माळवत्या अध्यक्षा अश्विनी गावस्कर यांनी मनोगत सादर केले.

लायनेस क्लब आता लिनेस क्लबमध्ये परावर्तीत झाला असून या क्लबच्या माध्यमातून सहका-यांच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील असे उर्मिला सावंत यांनी स्पष्ट केले. त्यांच्याच हस्ते गुणवंत विद्यार्थी डॉ.मयूर मणचेकर, शिवानी प्रभूखानोलकर, सिद्धार्थ भाटीया, मिताली कोयंडे यांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तनिष्क आजगांवकर व त्यांच्या टीमने सहकार्य केले. तसेच रिसॉर्टचा हॉल संग्राम सावंत यांनी मोफत उपलब्ध करुन दिला.

डॉ.वसुधा मोरे व अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी सूत्रसंचालन तर हेमा गावस्कर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page