*⚡कणकवली ता.११-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 60 वर्षांवरील नागरिकांना व हेल्थकेअर वर्कर्सना बूस्टर डोस देण्याच्या अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे, कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक श्री. नालवडे, अधीक्षक श्री. शिकलगार, टीएचएम भोई , सिस्टर नयना मुसळे, आरोग्य सहाय्यक विनोद सावंत व प्रशांत बुचडे उपस्थित होते.
