परबवाडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी हेमंत दत्ताराम गावडे

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* येथील परबवाडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस हेमंत दत्ताराम गावडे यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपसरपंच संतोष सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी हेमंत गावडे यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता व त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

व या निवडीनंतर शुभेच्छा देताना सरपंच विष्णू उर्फ पपु परब, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, शहराध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस , माजी सभापती सारिका काळसेकर, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, माजी उपसरपंच संजय मळगावकर, संतोष सावंत, ग्रामसेवक प्रविण नेमन, भूषण आंगचेकर, तुषार साळगावकर, समीर चिंदरकर, सत्यवान परब ग्रा.सदस्य कृतिका साटेलकर, ग्लानेस फर्नांडिस, अर्चना परब, सखी पवार, तसेच सुमेधा सावळ, प्रमोद नाईक, नाना राऊळ, कांता देसाई, राजा परब, प्रियांका किनळेकर, सिद्धेश कापडोस्कर उपस्थित होते.

You cannot copy content of this page