महिला व बालकल्याण समिती सभापती शर्वाणी गावकर यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन
*⚡सावंतवाडी ता.२४-:* सावंतवाडीत तालुक्यातील मळेवाड जकात नाका या अंगणवाडीला ‘स्मार्ट किट अंगणवाडी’ होण्याचा पहिला मान मिळाला असून स्मार्ट किट अंगणवाडीचा उदघाटन सोहळा महिला व बालकल्याण समिती सभापती शर्वाणी गावकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, बाल विकास प्रकल्प अधिकारी संध्या मोरे, सदस्या श्वेता कोरगावकर, उन्नती धुरी, पंचायत समिती सभापती निकिता सावंत, सदस्य गौरी पावसकर, मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अदिती ठाकूर, डॉ. पावसकर, संदीप नेमळेकर, केंद्र प्रमुख म. ल. देसाई, पर्यवेक्षिका आर्यशीला देऊलकर, ग्रामविकास अधिकारी अनंत गावकर, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, पालक, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे सुपारी रोप देऊन स्वागत करण्यात आले. संतोष भोसले यांनी अंगणवाडी सुविधा, योजनांबाबत माहिती देऊन या अंगणवाडीने केलेल्या कामाचे कौतुक केले. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी अंगणवाडीबाबत आपले विचार मांडून केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना संध्या मोरे तर आभार प्रदर्शन आर्यशीला देऊलकर यांनी मानले.
