Headlines

तळवडे बाजारपेठे नजिक खेरवाडीतील गटारे बुजवून उभारली दुकाने

नागरिकांना होतोय त्रास;कारवाई करण्याची सचिदानंद बुगडे यांची मागणी

*💫सावंतवाडी दि.११-:* तळवडे बाजारपेठेला लागून असलेल्या खेरवाडी रस्त्यावरील गटारे बुजवून त्या ठिकाणी अनेकांनी दुकान गाळे, शेड उभारली आहेत. परिणामी पावसाळ्यात या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांसह वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करावा अन्यथा याबाबत वरिष्ठ पातळीवर आवाज उठविला जाईल असा इशारा कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष सचिदानंद बुगडे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page