फुकाचे श्रेय आमदार वैभव नाईक यांनी घेऊ नये…

सुनील घाडीगांवकर, महेंद्र चव्हाण यांचा टोला;खाणक्षेत्र म्हणूनच हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा खनिकर्म निधीतून मिळाली हक्काची रुग्णवाहिका

*💫मालवण दि.११-:* हिवाळे हा परिसर खाणक्षेत्र आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणात दगड खाणी असल्याने मोठा महसूल शासनास मिळतो. त्यामुळेच जिल्हा खनिकर्म निधीतील रुग्णवाहिका प्राधान्याने हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाली. मात्र रूग्णवाहिका मिळाल्याचे फुकाचे श्रेय आमदार वैभव नाईक घेत आहेत. असा प्रहार पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर व जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी केला आहे. हिवाळे परिसरातील ग्रामस्थानी खाणींसाठी जमिनी दिल्या, गौण खनिज उत्खननातून शासनाला मिळालेल्या महसुलातुन अर्थात येथील जनतेच्या पैशातून रुग्णवाहिका उपलब्ध झाली. त्यामुळे आमदार नाईक यांनी न केलेल्या कामांचे फुकाचे श्रेय घेऊ नये. असा टोलाही सुनील घाडीगांवकर यांनी लगावला. हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रास प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण गुरुवारी जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती तथा पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर, सरपंच पुरुषोत्तम खेडेकर, सुशांत घाडीगांवकर, अरुण मेस्त्री, विश्वास परब संजय गावडे, मदन गावडे, काका गावडे, प्रशांत गावडे, रामचंद्र पवार, बबन परब, उत्तम परब, महेश गावडे, जितेंद्र परब, दिपक परब, प्रकाश कासले, बाबी हिवाळेकर, संकेत चव्हाण, प्रकाश परब, रवी राणे, डॉक्टर साळकर मॅडम व अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page