आप्पा पराडकर यांच्या माध्यमातून मच्छी मार्केट व भाजीविक्रेत्यांना फेसवायझर वाटप

*💫कणकवली दि.११-:* शिवसनेचे सिंधुदुर्ग रत्नागिरी संपर्कप्रमुख कामगार नेते आप्पा पराडकर यांच्या माध्यमातून कोरोना दक्षतेचा उपाय म्हणून कणकवली मच्छी मार्केट तसेच कणकवलीतील भाजीविक्रेते यांना फेस वायझरचे वाटप करण्यात आले. खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना सिंधुदुर्ग रत्नागिरी संपर्कप्रमुख कामगार नेते आप्पा पराडकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.कणकवली मच्छी मार्केट तसेच कणकवलीतील भाजीविक्रेते यांना फेस वायझरचे वाटप वैभव मालंडकर, मयूर चव्हाण, सचिन आगरकर, चंदन पाटील, संकेत बांदेकर, निलेश कदम, राजन म्हाडगुत, स्वप्नील पाटील हे शिवसैनिक उपस्थित होते

You cannot copy content of this page