सिंधूदुर्गनगरीतील ५० बेडच्या कोविड रुग्णालयाच्या कामाची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षानी केली पाहणी

म्हाडा कडून एक कोटिंचे हमीपत्र प्राप्त;अमित सामंत यांची माहिती

*💫ओरोस दि.१०-:* राज्याचे गृहनिर्माण मंञी ना.जितेंद्रआव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण विभागांतर्गत सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात कोवीड रूग्णालय उभारावे.येथील रूग्ण संख्येत घट व्हावी तसेच कोरोना संसर्ग आटोक्यात यावा अशा प्रकारची खास बाब म्हणून मागणी केली होती. त्यानुसार सिंधूदूर्ग ओरोस येथे ५० बेडचे कोवीड रूग्णालय मंजूर झाले असून त्याचे काम प्रशासना मार्फत युद्ध पातळीवर सुरू आहे. त्याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन आज जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पहाणी केली. कोवीड रुग्णालयाला म्हाडा प्रशासनाकडून १ कोटी रुपयांचे हमी पञ प्राप्त झाले आहे.यावेळीजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील.संघटक सचिव काका कुडाळकर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे.सुनिल भोगटे.अनंत पिळणकर सागर वारंग.विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत.अॅड. हितेश कुडाळकर.सर्व्हेश पावसकर.प्रशांत पाताडे.केदार भोसले.देवा पिळणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page